जुन्या आठवणी होणार ताज्या! ५० वर्षांनंतर नवीन अवतारात येणार 'ही' लोकप्रिय गाडी

मुंबई:  ८०च्या दशकातील लोकप्रिय मोपेड काइनेटिक लूना पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. काइनेटिक ग्रुप या लोकप्रिय मोपेडला इलेक्ट्रिक अवतारात लाँच करणार आहे. कंपनीने माहिती दिली की, ई-लूनाला लवकरच काइनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सॉल्यूशन्सद्वारे लाँच केले जाईल. काइनेटिक इंजिनिअरिंगद्वारे करण्यात आलेल्या नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती समोर आली आहे.काइनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेडने (केईएल) इलेक्ट्रिक मॉडेलसाठी चेसिस आणि अन्य गोष्टींचे उत्पादन सुरू केले आहे. कंपनी मुख्य स्टँड, साइड स्टँड, स्विंग आर्मसह इतर प्रोडक्शन देखील सुरू केले आहे. सुरुवातीला ५ हजार यूनिट्सची निर्मिती करण्याची कंपनीची योजना आहे.केईएलचे मॅनेजिंग डायरेक्टर अजिंक्य फिरोदिया यांनी माहिती दिली की, आम्हाला आशा आहे की २-३ वर्षात या व्यवसायात वर्षाला ३० कोटी रुपयांची वाढ होईल. याद्वारे केईएलला ईव्ही सेगमेंटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण होण्यास मदत होईल. कंपनीने एकेकाळी लूनाच्या दररोज २ हजारांपेक्षा अधिक यूनिट्सची विक्री आहे. नवीन अवतारात लाँच झाल्यानंतर देखील अशीच कामगिरी करेल, अशी आशा आहे.

फिरोदिया पुढे म्हणाले की, 'केईएल इलेक्ट्रिक टू आणि थ्री व्हीलर वाहनांसाठी सर्व प्रमुख मॅकेनिकल सब-असेंबलीसाठी वन-स्टॉप शॉप म्हणून पुढे येत आहे. मागील १२ महिन्यात आम्ही यात मोठी वृद्धी होताना पाहिले आहे.' केईएलने ५० वर्षांपूर्वी पहिले लूना मॉडेल लाँच केले होते. त्यावेळी या गाडीची किंमत फक्त २ हजार रुपये होती.८० च्या दशकात लूना एक लोकप्रिय मोपेड मॉडेल होते. बाजारात या गाडीची जवळपास ९५ टक्के हिस्सेदारी होती. यावरूनच मोपेडची लोकप्रियता लक्षात येते. दरम्यान, कंपनीने माहिती दिली की अहमदनगर येथील कंपनीच्या कारखान्यात गाडीचे उत्पादन सुरू झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने