मालवणी जेवण आणि ठेचा म्हणजे.. विकी कौशल मराठमोळ्या जेवणाच्या प्रेमात

मुंबई : अभिनेता विकी कौशल सध्या बराच चर्चेत आहे. विकी त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत होताच पण कतरिना कैफ बरोबर लग्न केल्यानंतर तो अधिक चर्चेत आला. सध्या बॉलीवुडमध्ये हवा आहे ती विकीचा आगामी चित्रपट 'गोविंदा नाम मेरा'ची. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी सध्या सगळीकडे भेट देत आहेत. याच निमित्ताने विकिने झी मराठी वरील 'चला हवा येऊ द्या' ह्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी विकी कौशलने कोल्हापुरी ठेचा आणि मराठमोळ्या जेवणाचे भरभरून कौतुक केले.

विकी कौशल आगामी चित्रपट 'गोविंदा नाम मेरा' च्या प्रमोशनसाठी मराठी कॉमेडी शो चला हवा येवू द्या सेटवर हजेरी लावली. यावेळी विकी कौशलने सांगितले की, मला जॅपनीज, चायनीज पेक्षा मालवणी जेवण खुप आवडतं, जगात लोक म्हणतात ही जेवण भारी, ते जेवण भारी.. पण मी सांगतो, मालवणी जेवण ही बेस्ट आहे. त्या शिवाय बाकरवडी पण माझी आवडती आहे. आणि सर्वात बेस्ट म्हणजे ठेचा. कितीही बोरिंग जेवणाला फक्त एक तिखट ठेचा असेल तर त्या जेवणाची पूर्ण चवच बदलून जाते,' अशा शब्दात त्याने मराठमोळ्या जेवणाचे कौतुक केले आहे.विकी कौशल आगामी चित्रपट 'गोविंदा नाम मेरा' च्या प्रमोशनसाठी मराठी कॉमेडी शो चला हवा येवू द्या सेटवर हजेरी लावली. यावेळी विकी कौशलने सांगितले की, मला जॅपनीज, चायनीज पेक्षा मालवणी जेवण खुप आवडतं, जगात लोक म्हणतात ही जेवण भारी, ते जेवण भारी.. पण मी सांगतो, मालवणी जेवण ही बेस्ट आहे. त्या शिवाय बाकरवडी पण माझी आवडती आहे. आणि सर्वात बेस्ट म्हणजे ठेचा. कितीही बोरिंग जेवणाला फक्त एक तिखट ठेचा असेल तर त्या जेवणाची पूर्ण चवच बदलून जाते,' अशा शब्दात त्याने मराठमोळ्या जेवणाचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने