Arjun Kapoor च्या 'कुत्ते' सिनेमाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष अन् वाढवला सस्पेन्स...

मुंबई: अर्जुन कपूर, नसीरुद्दीन शाह आणि तब्बू अभिनीत आगामी चित्रपट 'कुत्ते'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. अशातच, आता कोंकणा सेनशर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या इंटेन्स पोस्टरमध्ये पात्रांची आणि जगाची झलक पाहायला मिळते.यापूर्वी, चित्रपटाच्या पोस्टर लाँच घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये याची चर्चा होती. ज्यामुळे निर्मात्यांना प्रेक्षकांकडून आणि फिल्म इंडस्ट्रीकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. अशातच, आज 'कुत्ते'या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे, ज्यामध्ये कलाकारांचा लूक आणि पात्रांची झलक पाहायला मिळेल. तसेच, या पोस्टरमध्ये प्रत्येकजण नायक आणि खलनायक दिसत आहेत.
'कुत्ते'या चित्रपटाद्वारा आसमान भारद्वाज दिग्दर्शनात पदार्पण करत असून, या कथेतील ताजेपणामुळे चित्रपट प्रेक्षकांवर नक्कीच आपली छाप सोडेल. अलीकडेच, आसमान भारद्वाज आणि विशाल भारद्वाजद्वारा लिखित या चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण करण्यात आले होते ज्याला खूप प्रेम मिळाले.लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित, 'कुत्ते'हा चित्रपट गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजची प्रस्तुती आहे. तसेच, या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाजनं दिलं असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत. 'कुत्ते'हा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने