पुणेकरांचा थर्टी फस्ट यंदा जोरात; 'वन डे परमिट'साठी लाखांवर अर्ज

पुणे : यंदा पुणेकरांचा थर्टीफस्ट जोरात होणार आहे. कारण पुणेकरांकडून मद्य प्राशनाच्या 'वन डे परमिट'साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लाखोंच्या संख्येनं अर्ज केले आहेत. विभागाच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील १,६५,००० नागरिकांनी अर्ज केले आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहितीनुसार, यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत मद्य परवान्यासाठीच्या अर्जांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यातून एका दिवसासाठी १,६५,००० मद्य परवाने देण्यात आले आहेत. या 'वन डे परमिट'ची किंमत पाच रुपये आहे.दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाची मद्यपींवर करडी नजर असणार आहे. विनापरवाना मद्यप्राशन किंवा विक्री केली तर गुन्हा दाखल होऊ शकतो. यासाठी पुणे जिल्ह्यात ३१ डिसेंबर रोजी १० विशेष पथकं या मद्यपींवर नजर ठेवणार आहे. यामध्ये रात्रीच्या गस्ती, अनधिकृत ढाबे, फार्म हाऊस तसेच संशयित गाड्यांची तपासणी होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी ही माहिती दिली.डिसेंबर महिन्यात अनधिकृत मद्यविक्री संदर्भात २४० गुन्हे दाखल झाले आहेत. तर १७ वाहनं जप्त करण्यात आली आहेत यामध्ये ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने