लक्षद्वीपच्या 36 बेटांपैकी 17 बेटांवर घातली बंदी; प्रशासनानं दिलं 'हे' महत्वाचं कारण

लक्षद्वीप: लक्षद्वीप प्रशासनानं गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा  आणि सार्वजनिक सुरक्षेच्या कारणास्तव एकूण 36 बेटांपैकी 17 बेटांवर प्रवेश करण्यास मनाई केलीये.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक

ही 17 बेटं निर्जन स्थळी असून त्यांना भेट देण्यासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची (SDM) परवानगी आवश्यक आहे. लक्षद्वीपच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी (DM) फौजदारी संहिता (CrPC) च्या कलम 144 अंतर्गत या संदर्भात औपचारिक अधिसूचना जारी केलीये. दहशतवादी किंवा तस्करीच्या कारवाया रोखण्यासाठी बुधवारी या बेटांवर प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला.लेखी परवानगीशिवाय प्रवेशावर बंदी

बेटांवर समाजकंटक आणि देशद्रोही कृत्यांमध्ये गुंतलेले लोक असू शकतात, त्यामुळं हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं. प्रशासनानं आपल्या आदेशात म्हटलंय, बेटांवर तस्करी, शस्त्रं किंवा अंमली पदार्थ लपवणं यासारखे प्रकार घडू शकतात. शिवाय, दहशतवादी संघटना देशातील महत्त्वाच्या संस्था आणि गर्दीच्या ठिकाणांवर हल्ला करून नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळं लक्षद्वीपच्या 17 निर्जन बेटांवर पूर्व लेखी परवानगीशिवाय प्रवेशावर बंदी घालणं योग्य वाटतं, असं नमूद करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने