सत्तारांच्या अडचणी वाढणार? राजीनाम्याची मागणी होताच झाले 'नॉट रिचेबल'

मुंबई:  गायरान जमीन घोटळ्यावरुन विरोधीपक्ष अजित पवारांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप केले आहेत. अब्दुल सत्तारांकडून पदाचा दुरुपयोग झाला त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अजित पवारांनी विधानसभेत केली. विधानसभेमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता अब्दुल सत्तार यांचा फोन बंद असल्याचे समोर आले असून सध्या ते नॉच रिचेबल आहेत.कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीनीचा भूखंड अवैधरित्या दिल्याचा आरोप आहे. 

त्यानंतर आता अब्दुल सत्तार नॉट रिचेबल आहेत, तसेच त्यांचा नागपूर येथील बंगला देखील रिकाम असल्याचे समोर आले आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभाग्रहांमध्ये अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, नेमके अब्दुल सत्तार आहेत कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे.त्यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानात देखील सत्तार दोन दिवसांपासून आलेले नाहीत. त्यांचे पीए देखील याठीकाणी उपस्थीत नाहीत. तसेच सत्तार यांनी सभाग्रहातील कामकाजात देखील त्यांनी सहभाग घेतलेला नाही. साम टिव्हीने याबद्दल वृत्त दिले आहे.प्रकरण काय आहे?

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना अब्दुल सत्तार हे राज्याचे महसूल मंत्री होते. याचवेळी अब्दुल सत्तार यांनी वाशिम मधील 37.19 एकर गायरान जमिनीचे अवैध वाटप केल्याचा दावा हायकोर्टात करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते श्याम देवळे व संतोष पोफळे यांनी याबाबतची याचिका हायकोर्टात दाखल केली होती. याबाबत अब्दुल सत्तार यांना नोटिस देण्यात आली आहे.याबाबत, नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली. यासंबधी हायकोर्टाने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध आहेत. तर जिल्हा कोर्टाचा आदेश माहीत असूनही सत्तारांनी हा निर्णय घेतला आहे. जगपाल सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य सरकारच्या जीआरची पायमल्ली अब्दुल सत्तारांच्या निर्णयामुळे झाली आहे, असे म्हणत कोर्टाने अब्दुल सत्तार यांना नोटीस पाठवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने