'सुशांत मृत्यूमागे मागे मोठं षडयंत्र'... वकिलाचा गौप्यस्फोट

मुंबई: बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला. त्याला जावून अडीच वर्ष झाली असली तरी त्याच्या चाहत्यासाठी तो अजूनही जिवंतच आहे. त्याने आत्महत्या केली असावी यावर अजूनही त्यांचा विश्वास बसत नाही. त्यांची बहिण अजूनही त्याला ज्ञाय मिळावा यासाठी लढत आहे.त्यातच आता या प्रकरणाला अजून वेगळं वळण मिळालंय. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली होती, असा दावा कूपर रुग्णालयातल्या शवागृहात काम करणाऱ्या रुपकुमार शाह यांनी केला आहे. सुशांतचा मृतदेह आला तेव्हा त्याच्या मृतदेहावर जखमा होत्या, शरीराला मुका मार लागला होता, असंही शाह यांनी सांगितलं होतं. आता त्यातच या वक्तव्यानंतर आता सुशांत सिंह राजपूत याच्या वकीलानंही प्रतिक्रीया दिली आहे. विकास सिंह याच्या म्हणण्यानूसार सुशांतचा मृत्यू ही थेट आत्महत्या नसल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेत्याचा मृत्यू हे एक मोठे षडयंत्र असल्याचं त्यांनी सांगितले.विकास सिंह यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, मी सध्या या विषयावर फार काही बोलू शकत नाही. पण सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू ही साधी आत्महत्या नव्हती, असं मला म्हणायचे आहे. यामागे मोठे षडयंत्र होते. या मृत्यूमागील कट सीबीआयच उघड करू शकतं.तर दूसरीकडे सुशांतची बहीण श्वेता सिंग हिनेही कूपर हॉस्पिटलच्या त्या कर्मचाऱ्याच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले होते की, आम्ही सीबीआयला विनंती करतो की जर या विधानात सत्यता असेल तर या व्यक्तीला सुरक्षा देण्यात यावी. या खटल्यासाठी प्रत्येक पुरावा महत्त्वाचा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने