आता अर्जेंटिनाच्या नोटेवर दिसणार 'मेस्सी'; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

अर्जेंटिना : अर्जेंटिनाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्यानंतर लिओनेल मेस्सीची  लोकप्रियता आणखी वाढलीये. जगभरातील फुटबॉलप्रेमींमध्ये मेस्सीची क्रेझ पहायला मिळतेय.विश्वचषक ट्रॉफीसह संपूर्ण टीम अर्जेंटिनात पोहोचल्यावर, त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. विश्वविजेत्या टीमचं स्वागत करण्यासाठी ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर लाखो लोक उतरले होते. इतकंच नाही, तर मेस्सी त्याच्या गावी पोहोचल्यानंतरही त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. पण, आता मेस्सीबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. अर्जेंटिना सरकार आपल्या नोटेवर मेस्सीचा फोटो लावण्याच्या मनस्थितीत असल्याचं वृत्त आहे.अर्जेंटिना सरकारनंआपली कल्पना अंमलात आणून तेथील नोटेवर मेस्सीचा फोटोही छापला आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर एखाद्या खेळाडूच्या फोटोला देशाच्या चलनावर स्थान मिळण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. विश्वचषकाच्या आनंदात देशाला सर्वात मोठा सन्मान किंवा सर्वात मोठा पुरस्कार मिळतो, हे आपण पाहिलंय. पण, हा प्रकार नक्कीच पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाहीये.

अर्जेंटिनानं तिसऱ्यांदा जिंकला फिफा विश्वचषक

FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनानं फ्रान्सचा पराभव करून तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. यापूर्वी त्यांनी 1978 आणि 1986 मध्ये हे विजेतेपद पटकावलं होतं. त्या अर्थानं मेस्सीचं हे पहिलंच विश्वचषक विजेतेपद होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने