2024मध्ये देशात परिवर्तन होणार; संजय राऊतांनी सांगितला फंडा

मुंबईः गुजरातमध्ये भाजपला ऐतिहासित बहुमत मिळण्याच्या मार्गावर आहे. तर हिमाचलमध्ये भाजप आणि काँग्रेमध्ये 'काँटे कि टक्कर' सुरुय. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी २०२४मध्ये भाजपला रोखण्यासाठीचा फंडा सांगितला आहे.संजय राऊत म्हणाले की, गुजरात निवडणुकीचे निकाल अपेक्षित आहेत. परंतु आघाडी झाली असती तर लढत टफ झाली असतील. इतर पक्षांनी एकत्रित येऊन लढणं गरजेचं होतं. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने लढा देत आहे ते एक प्रातिनिधिक आहे.२०२४मध्ये देशात परिवर्तन होईल, मात्र त्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे. गुजरात लोकसभेमध्येही हे परिवर्तन शक्य असल्याचं राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे विरोधकांचे २०२४मध्ये एकत्र येण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत.सध्या गुजरातमध्ये भाजप १५०पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसची गुजरातमध्ये पूर्णतः पिछेहाट झाल्याचं दिसून येतंय. दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये टफ फाईट सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने