मुंबई : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग याचं जाणं हे अजुनही त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. त्याचे चाहते हे नेहमीच त्याच्या आणि त्याच्या कुटूंबियाप्रती सहानुभूती व्यक्त करताना दिसतात. वेगवेगळ्या कारणासाठी सुशांत हा सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतो. आता त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं लक्ष वेधून घेतलं आहे.सुशांतचा मृत्यु झाल्यानंतर विविध कारणांसाठी रिया देखील सोशल मीडियावर चर्चेत आली होती. तिच्यावर ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यासाठी तिला एनसीबीनं चौकशीसाठी बोलावले होते. याशिवाय ईडीच्या फेऱ्यातही ती अडकल्याचे दिसून आले होते. आता ती एका वेगळयाच कारणासाठी चाहत्यांच्या चर्चेचा विषय झाली आहे. तो विषय म्हणजे तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड.
गेल्या काही दिवसांपासून रिया ही एका उद्योगपतीला डेट करत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिला त्या बिझनेसमनशी लग्न करायचे आहे. त्यामुळे ती त्याला डेट करते आहे. त्या उद्योगपतीचे नाव बंटी सजदेह असे आहे. बंटी हा रियलिटी स्टार आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेहचा भाऊ आहे. त्या गेल्या काही वर्षांपासून मनोरंजनविश्वात सक्रिय आहे. तो चालवत असलेल्या फर्मची सोशल मीडियावर चर्चाही आहे.
गेल्या काही दिवसांपासून रिया आणि बंटीच्या अफेयरची चर्चा आहे. असं म्हटलं जातं की या वर्षाच्या सुरुवातीपासूनच ते एकमेकांना डेट करत आहेत. रियाच्या चाहत्यांनी देखील रियाच्या त्या नव्या नात्यावर आनंद व्यक्त केला आहे. तिला वेगवेगळ्या कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. ७ ऑक्टोबरला बंटीचा जन्मदिवस होता. त्यावेळी रियाला बंटीच्या पार्टीमध्ये स्पॉट केले गेले होते. काही झालं तरी आपलं नातं हे काही कुणाला सांगायचं नाही असे त्यांनी ठरवले आहे. त्यामुळेच की काय अजुन त्यांचे फारसे फोटो व्हायरल झालेले नाहीत.