कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेश सीमावाद? बुलढाण्यातील ४ गावांचा राज्यसरकारला इशारा

मुंबई: राज्यात कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेश सीमावाद प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुलढाण्यातील ४ गावांनी राज्यसरकारला इशारा दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितला आहे. तसेच, सोलापुरातही हक्क दाखवला आहे. दरम्यान, सोलापुरातील काही गावांनी राज्यसरकार कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.
अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील ४ गावांनी मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुलढाण्यातील 4 गावातील नागरिकांनी मध्यप्रदेश जाण्याचा निर्णय घेतला आहे. मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे. पाणीप्रश्न, आरोग्य सुविधा, शिक्षण अशा मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.त्यामुळे कर्नाटक वादासोबत आता मध्यप्रदेश सीमावादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने