सीमावाद चिघळला! 'कन्नड वेदिके' संघटनेकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक

बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न वरचेवर चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे.कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नारायण गौडा हे बेळगाव दौऱ्यावर आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे.
दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील 18 गावं कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव, कोर्सगांव, मुंडेवाडी, कुमठे, केगांव बु., केगांव खुर्द, चिंचोली नजीक, सुलेरजवळगे, तडवळ, शेगाव, धारसंग, कल्लकजोळ इत्यादी गावं हे कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत. तर जत तालुक्यातल्या 40 गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने