'संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडलं?'

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमवादप्रश्नी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगावला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडलं का? अशी चर्चा रंगली आहे. माध्यमांशी बोलतानात संजय राऊत यांनी पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बेळगावला जायाला तयार आहोत. आम्ही कर्नाटकात जाणार. जे मंत्री घाबरत आहेत. त्यांना सरंक्षण देऊन बेळगावत घेऊन जातो. असं वक्तव्य केलं.दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.काय म्हणाले शंभुराज देसाई?

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यपेक्षा शरद पवारांचे नेतृत्व मोठं वाटतं. आम्ही हीच गोष्ट उद्धव ठाकरे यांन अडिच वर्षापूर्वी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. राऊत हे राष्ट्रवादी पक्षाच्या आहारी गेले आहेत.उद्धव ठाकरेंची शिवसेना संजय राऊत राष्ट्रवादीच्या दावणीला बांधत आहेत. राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी आपल्या नेतृत्वाचं स्थान बदललं आहे का? अशी शंका उपस्थित होतआहे.

शरद पवारांचा अल्टीमेट

सीमाभागातल्या घडामोडी पाहाता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. बेळगावला आज जे घडलं ते निषेधार्ह आहे. सीमावादाला वेगळं रुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.परिस्थिती लवकर सुधारली नाही तर मी आणि माझ्या पक्षातले लोक बेळगावच्या स्थानिक लोकांना साथ देण्यासाठी तिथं जाऊ, अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही गावं कर्नाटकात समाविष्ट करून घेणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. त्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने