'कार'नामा! महिंद्राच्या 'या' गाडीने केला वर्ल्ड रेकॉर्ड, जगात ठरली नंबर-१

मुंबई: भारतीय कार निर्माता कंपनी महिंद्रा आता जगभरात आपला दबदबा निर्माण करत आहे. कंपनीच्या एसयूव्ही आणि एमपीव्हीला ग्राहकांची पसंती मिळत आहे. एवढेच नाही तर महिंद्रा थार ते नवीन स्कॉर्पियो एनला खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे.कंपनी भारतासोबतच परदेशातही ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यास यशस्वी ठरली आहे. आता कंपनीच्या एका कारने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. महिंद्राच्या मालकीची कंपनी असलेल्या Automobili Pininfarina च्या Battista हायपरकारने हा रेकॉर्ड केला आहे. ही जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक व्हीकल ठरली आहे.या हायपरकारने दुबईच्या ऑट्रोड्रोम येथे अवघ्या 1.79 सेकंदात ताशी ० ते ६० किमीचा वेग पकडला. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील ट्विट करत या रेकॉर्डची माहिती दिली. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत माहिती दिली की, ऑल-इलेक्ट्रिक बटिस्टा हायपरकार ही जगातील सर्वात वेगवान स्ट्रीट-लीगल व्हीकल ठरली आहे. ऑटोमोबिली पिनिनफेरिनासह संपूर्ण महिंद्रा समूहाची ही कल्पना होती, असेही ते म्हणाले.महिंद्रा यांच्या या ट्विटनंतर यूजर्सकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. एका यूजरने ट्विट करत कारच्या किंमतीची माहिती देखील दिली. यूजरनुसार, कारची किंमत जवळपास २० कोटी रुपये आहे.

Automobili Pininfarina Battista चा वर्ल्ड रेकॉर्ड

रिमॅक नेव्हेराचा (१.८६ सेकंद) रेकॉर्ड मोडत या हायपरकारने अवघ्या १.७९ सेकंदात ताशी ० ते १०० किमीचा वेग पकडला. तर हायपरकारला ० ते २०० किमीचा वेग पकडण्यासाठी ४.४९ सेकंद लागले. या कारला कंपनीने ४ वर्षांपूर्वी सादर केले होते. ही कार अचानक वेग कमी करण्यास देखील सक्षम आहे, जो ईव्हीसाठी एक रेकॉर्ड आहे.कारच्या बॅटरी सेलला कार्बन फायबरने बनलेल्या मोनोकोक चेसिसच्या आतील टी-आकाराच्या लेआउटमध्ये ठेवण्यात आले आहे. बॅटरीला पेसेंजर आणि ड्राइव्हरच्या मध्यभागी असलेल्या जागेत फिट करण्यात आले आहे. बॅटरी पॅकची क्षमता १२०kWh आहे. यात ६९६० लिथियम-आयन सेल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने