मोदींच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जींचा स्टेजवर बसण्यास नकार; कारण...

कोलकाता :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ज्या व्यासपीठावरून न्यू जलपाईगुडीसाठी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते, त्या व्यासपीठावर बसण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला. त्यामुळे शुक्रवारी हावडा स्थानकावरील कार्यक्रमात विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजीटल माध्यमातून उपस्थित होते.रेल्वे स्थानकावरील गर्दीतील एका गटाने जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे बॅनर्जी नाराज झाल्या होत्या. त्यानंतर रेल मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यपाल सी. वी. आनंद बोस यांनी ममता यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे ममता व्यासपीठासमोर ठेवलेल्या खुर्चीवरच बसून होत्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ईशान्येकडील प्रवेशद्वार असलेल्या हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला डिजिटली हिरवा झेंडा दाखवला . तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.पंतप्रधान यांच्या मातोश्रींचे आज निधन झालं. त्यामुळे मोदींना आजचा कोलकाता दौरा रद्दा करावा लागला. आईच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावल्यानंतर मोदींनी थेट गांधीनगर राजभवन गाठलं आणि व्हीसीच्या माध्यमातून कोलकाता येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने