भारत जोडो यात्रेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

राजस्थानकाँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून देशभर दौरे करत आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशातल्या विविध राज्यांमध्ये ते भेट देत आहेत, तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. याच भारत जोडो यात्रेमध्ये आज एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. ही यात्रा सध्या राजस्थानमधल्या कोटामध्ये आहे. इथे एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाने स्वतःला पेटवून घेतलं आहे. युथ काँग्रेसच्या धोरणावर नाराज असल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं या तरुणाने सांगितलं. आजूबाजूच्या लोकांच्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने