कतरिनाशी लग्नाच्या निर्णयावर काय होती विकीच्या आई-बाबांची Reaction.. अभिनेत्यानेच केला खुलासा

मुंबई : अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण दोघांचे जोडपे आजही नुकतंच लग्न झालेल्या कपल सारखं नवं नवं वाटतंय. दोघेही स्टार जेव्हा एकत्र दिसतात तेव्हा चाहते खूप खूश होतात. सध्या विकी कौशल आपला सिनेमा 'गोविंदा नाम मेरा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.या सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखती दरम्यान विकीनं नात्यातील खरेपणावर भाष्य केलं आहे. जेव्हा त्याच्या पालकांना तो कतरिनाशी लग्न करण्यास इच्छुक आहे याविषयी कळलं तेव्हा त्यांची रिअॅक्शन काय होती यावर देखील त्यानं या मुलाखतीत खुलासा केला आहे.विकी कौशलने एका मुलाखतीत म्हटलं आहे की,''मी खरेपणावर खूप विश्वास ठेवतो. फक्त रोमॅंटिक नात्यात नाही तर प्रत्येक नात्यात खरेपणा,ईमानदारी टिकवून ठेवणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. मैत्री असो,रोमॅंटिक नातं असो,भावा-बहिणीचं नातं, आई-वडील मग ते कोणतंही नातं असो..विश्वास,प्रेम आणि ईमानदारी त्यात असावी. हे माझे वैयक्तिक विचार आहेत''.विक्की पुढे म्हणाला,''तुम्ही नात्यात इतकं खरं राहिलात तर त्याने तुम्हाला शांती आणि सुखद अनुभव मिळेल. ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षणी प्रेमाचा अनुभव घ्याल. आणि जेव्हा तुम्हाला प्रेम मिळेल तेव्हा तुम्ही फक्त घरात नाही तर बाहेर समाजातही तसेच प्रेमानं वागाल. आणि ही गोष्ट तुमच्या व्यक्तीमत्त्वाला अधिक चांगलं बनवेल असं मला वाटतं''. विकीनं या दरम्यान कतरिना कैफला जीवनसाथी म्हणून आपल्या आयुष्यात घडलेली सुंदर गोष्ट असं म्हटलं आहे.

विकीनं या मुलाखतीत कतरिना सोबत लग्नाच्या निर्णयाविषयी आई-वडीलांना सांगितल्यावर त्यांची रिअॅक्शन काय होती याविषयी देखील खुलासा केला आहे. तो म्हणाला,''माझा निर्णय ऐकून आई-वडील खूप खूश होते. त्यांना ती खूप आवडते. ती ज्या पद्धतीची मुलगी आहे,जसं वागते ते सगळंच त्यांना भावतं. मला वाटतं तुमचं मन चांगलं असेल तर तुम्ही समोरच्यातला चांगुलपणा ओळखता''.माहितीसाठी थोडक्यात सांगतो की,विकी कौशलचा 'गोविंदा नाम मेरा' हा सिनेमा डिस्ने हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. सिनेमात कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने