तेव्हापासून कानाला खडा, सरत्या वर्षानं दिला मोठा धडा! सईचा मोठा निर्णय

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सई ही नेहमीच तिच्या हटकेपणासाठी ओळखली जाते. गेल्या काही वर्षात सईनं बॉलीवूडमध्ये देखील आपल्या नावाची वेगळी मोहोर उमटवली आहे. तिला मीमी या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले होते.सई ही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी म्हणून तिच्या चाहत्यांना माहिती आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नव्या वर्षाच्या स्वागताला आता सगळेजण तयार झाले आहेत. कित्येकांनी त्यादिवसासाठी वेगवेगळे प्लॅन केले आहेत. काहींनी नवे संकल्पही केले आहेत. यात मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटीही मागे नाहीत.सईनं देखील गेल्या वर्षाकडून आपल्याला काय शिकायला मिळाले आणि आपण नव्या वर्षात काय करणार आहोत याविषयी सांगितले आहे. सरत्या वर्षांत एक मोठी शिकवण आपल्याला मिळाली. त्याचा तिला मोठा उपयोग होणार असल्याचे तिनं म्हटले आहे. सई यंदाच्या वर्षी पाँडेचिरी या मराठी चित्रपटामध्येही दिसली होती. त्यातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

सईच्या पेट पुराण नावाच्या मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते. याशिवाय तिच्या इंडिया लॉकडाऊनची आता चर्चा आहे. त्यानिमित्तानं अभिनेत्रीनं सरत्या वर्षात आपल्याला नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याविषयी सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नलशी बोलताना तिनं काही गोष्टी शेयर केल्या आहेत. सई म्हणाली, २०२२ हे वर्ष मला खूप शिकवून जाणारं होतं. मी एक अभिनेत्री आहे. हजारो प्रेक्षक तुम्हाला पाहत असतात.आपण ज्यावेळी पब्लिक फिगर असतो तेव्हा व्यक्त होताना जास्त काळजी घ्यावी लागते. सरत्या वर्षानं आपण कसं व्यक्त व्हावं हे खूप छान पद्धतीनं सांगितलं आहे. त्यामुळे नव्या वर्षात ती गोष्ट मी अनुसरणार आहे. असे सईनं म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने