गुजरातमध्ये आहे चक्क आफ्रिकन गाव, आज मतदानासाठी झालंय सुसज्ज!

गुजरात: आपला देश प्रत्येक बाबतीत खूप वेगळा आहे. भारतातील अनोख्या गोष्टी सर्वांना आकर्षित करतात. भारतात असलेले पण अद्याप प्रकाशझोतात न आलेले अनेक गावं, समाज आहेत. असाच एक दुर्लक्षित राहीलेला समाज भारतीय निवडणूक आयोगामूळे चर्चेत आला आहे. तो म्हणजे मिनी आफ्रीका होय.हो भारतातही आफ्रीका आहे. केवळ नाव नाहीतर तिथले लोकही मूळचे आफ्रीकेतील आहेत. मिनी आफ्रीका हा गुजरातचाच एक भाग आहे. सध्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकांची जोर धरला आहे. त्यामूळे त्या दुर्लक्षित लोकांचा विकास करण्यासाठी नाही. तर त्यांच्या मतांसाठी त्यांच्या गावात पहिल्यांदा मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.गुजरातमधल्या आफ्रिकेत राहणारे लोक सिद्दी या नावाने ओळखतात. ही आदिवासी जमात गुजरातच्या गीर जंगलात स्थायिक आहे. या गावाला जांबूर म्हणतात. हे आदिवासी मूळचे आफ्रिकेतील आहेत. या जमाती आफ्रिकेतील बंटू समुदायाशी संबंधित आहेत. पोर्तुगीजांनी त्यांना गुलाम म्हणून भारतात आणले. ते सुमारे 750 वर्षांपूर्वी भारतात आले असावेत,  असे इतिहासकाचे मत आहे.गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या आफ्रिकन गावातील लोक बूथवर प्रथमच मतदान करणार आहेत. जांबूर गावातील ज्येष्ठ नागरिक रहमान यांनी सांगितले की, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आमचे पूर्वज आफ्रिकेतील असूनही आम्ही भारतातील परंपरा जपतो.तलाला येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले अब्दुल मगूज भाई म्हणाले की, हे गाव दोन नद्यांच्या मध्ये वसले आहे. इथे सगळे एकत्र राहतात. मी तिसर्‍यांदा येथून निवडणूक लढवत आहे. आपल्या समाजातील लोकही विधानसभेत जावेत, अशी आमची इच्छा आहे. आम्हाला अधिक चांगले काम करता यावे म्हणून अधिकार मिळतात. सरकार आदिवासींना मदत करत राहते, त्यात काही अडचण नाही. पण आमच्या स्थानिक समाजाला इथे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आम्हाला तेवढ्या सुविधा मिळत नाहीत.

हा समाज भारतात कसा आला याबद्दल काही लोक असेही म्हणतात की, जुनागढचा तत्कालीन नवाब एकदा आफ्रिकेत गेला होता. आणि त्याने एका आफ्रिकन महिलेशी लग्न करून तिला भारतात आणले होते. त्या महिलेने तिच्यासोबत सुमारे 100 गुलामही भारतात आणले. त्यामुळे या समाजाचा हळूहळू विकास होत गेला. हे लोक पाकिस्तानातही आहेत, असे काही इतिहासकारांचे मत आहे.या जमातीतील काही लोक ख्रिश्चन धर्माचे अनुसरण करतात तर काही इस्लामचे अनुसरण करतात. अल्पसंख्याकही हिंदू धर्माचे पालन करतात. गुजरातबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातही या जमाती आढळतात. भारतात त्यांची एकूण संख्या सुमारे 50 हजार आहे. आजही त्यावर आफ्रिकन सभ्यतेचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो. हे लोक लग्नाबाबत अतिशय कडक दृष्टिकोन स्वीकारतात. ते त्यांच्या समाजातच लग्न करतात. त्यामुळे त्यांची लोकसंख्या फारशी वाढली नाही. पर्यटक गीर जंगलात फिरण्यासाठी येतात आणि या आदीवासींच्या पारंपरिक नृत्याचा आनंदही घेतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने