'आई तुझा फोन परत कधीच...' अभिनेत्री रेशमला मातृशोक

मुंबई :  मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, बिग बॉसमधून चाहत्यांच्या नेहमीच चर्चेत असलेल्या रेशम टिपणीसचा चाहतावर्ग मोठा आहे. आता रेशम टिपणीसची एक पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ती पोस्ट वाचल्यानंतर तिच्या चाहत्यांनाही शोक अनावर झाला आहे. त्यांनी देखील तिच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.रेशम टिपणीसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आईचे निधन झाले असून रेशमनं शेयर केलेल्या पोस्टनं चाहतेही भावूक झाले आहेत. रेशमची ती पोस्ट चाहत्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारी ठरली आहे. आईचा फोन मला पुन्हा कधीही येणार नाही. तिची उणीव नेहमीच जाणवेल....तिच्या जाण्यानंतर खूप मोठा आघात माझ्यावर झाला असून तिचं जाणं खोलवर रुतून जाणारं आहे. असे रेशम म्हटली आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रेशमच्या पोस्टवर चाहत्यांनी तिला आधार दिला आहे. तिचं सांत्वन करत तिला काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. आईचा आणि तिच्या होणाऱ्या गप्पा-गोष्टी आता आमच्यात होणार नाही. असल्याचंही रेशमने म्हटलं आहे. रेशम आपल्या पोस्टमध्ये म्हणते, 'आई…यापुढे तुझा फोन मला कधीच येणार नाही या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तू मला खंबीर बनवलंस. मी तूला वचन देते की यापुढेही मी अशीच खंबीर राहिन. खूप प्रेम. मला तुझी खूप खूप आठवण येत येईल.”रेशमची ती पोस्ट व्हायरल होताच त्यावर तिच्या शेकडो चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी देखील रेशमला आधार दिला आहे. तिचे सात्वंन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने