फिल्मफेअर पाहून अमिताभ यांच्या डोळ्यात पाणी! का झाले भावूक?

मुंबई: बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ यांच्याविषयीची कोणतीही गोष्ट बातमी होऊन जाते. वयाचे कोणतेही बंधन अमिताभ यांच्या आड येत नाही. त्यांनी वयावर मात करुन तरुणांसाठी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. आज देशातील तरुणांसाठी अमिताभ ही मोठे प्रेरणास्थान आहे. सध्या एका वेगळ्या कारणासाठी बिग बी चर्चेत आले आहे.बिग बी हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारे व्यक्तिमत्व आहे. कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसीमधून अमिताभ हे चाहत्यांच्या चर्चेचा विषय होतात. चाहत्यांचा असा एकही दिवस जात नाही की त्यात अमिताभ यांच्याविषयी बोललं जात नाही. भारतात अमिताभ यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आता अमिताभ यांनी शेयर केलेली ती पोस्ट भलतीच चर्चेत आली आहे. त्यामागील कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत.त्याचे झाले असे की, अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. अभिषेकच्या बहुचर्चित अशा दसवी या चित्रपटाला फिल्मफेयरचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे अमिताभ भलतेच खुश झाले आहे. त्यांनी अभिषेकला मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्याचे तोंडभरून कौतूक केले आहे. अमिताभ यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. ओटीटी २०२२ च्या फिल्मफेयरमध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड गौरविण्यात आले आहे. अमिताभ यांनी एक खास पोस्ट शेयर केली आहे.

अमिताभ यांनी लिहिलं आहे की, मी सर्व प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो. अभिषेकची त्या चित्रपटामुळे खिल्ली उडविण्यात आली होती. त्याच्यावर खूप टीकाही झाली होती. हे मी सगळे जवळून पाहिले आहे. त्यामुळे आता त्याला जे यश मिळाले आहे ते पाहून मी खूश झालो आहे. मला त्याचा अभिमान आहे. अभिषेकचे जे यश आहे त्यात त्याचा संघर्ष मोठा आहे. मात्र त्यानं धैर्य आणि संयमानं सर्वांना जिंकून घेतले आहे. अशा शब्दांत अमिताभ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने