एवढी बोली लागण्यासारखं मी केले तरी काय... मुंबई इंडियन्सला घरचा आहेर

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला यंदाच्या आयपीएल लिलावात छप्पर फाड के बोली लागली. ऑस्ट्रेलियन खेळाडूला आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर मुंबई इंडियन्सने त्याला 17.5 कोटी रूपये बोली लावत आपल्या कुटुंबात सामावून घेतले. अवघ्या 23 वर्षाच्या ग्रीनने अजून ऑस्ट्रेलियन संघात आपला जम बसवलेला नाही तोवरच त्याला आयपीएलने महागडा खेळाडू करून टाकले.दरम्यान, कॅमेरून ग्रीनने देखील लिलावाला एक दिवस उलटतो ना उलटतो तोच आपला दम दाखवत दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने आयपीएलमध्ये लालेल्या भल्या मोठ्या जॅकपॉटबद्दलही आपले मत व्यक्त केले. ग्रीन म्हणाला की, 'स्पष्ट सांगायचं झालं तर मला असं वाटतं की मला एवढी मोठी बोली लागावी असं अजून मी काही केलेलंच नाही. मी फक्त लिलावासाठी माझे नाव दिले आणि हे सगळे झाले. मात्र यामुळे माझ्या विचार करण्याच पद्धतीवर किंवा माझ्या व्यक्तीमत्वावर कोणताच फरक पडलेला नाही. मला माझ्या क्रिकेटवर विश्वास आहे. मला आशा आहे की मी खूप बदलणार नाही.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने