भावा तू यूपीएससी कर! मुंबईच्या रिक्षावाल्याचं जनरल नॉलेज बघून चक्कर येईल

मुंबई : बऱ्याचदा असं घडतं की, तुम्ही तासनतास ट्रॅफिक जाममध्ये अडकलेले असता. मग आपण इकडं तिकडं बघत बसतो. असंच बघता बघता आपली नजर इतर गाड्यांच्या काचांमधून आत जाते. म्हणजे टाईमपास करण्यासाठी लोक काय काय करतील याचा अंदाज आपल्या नजरेला येतो.असंच एक इन्स्टाग्राम युजर राजीव कृष्णा मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये तासभर अडकला होता. या ट्रॅफिकमध्ये त्याच्या ऑटो ड्रायव्हरने त्याचं असं काही मनोरंजन केलं की, तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.राजीव कृष्णाने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केलाय. सोबतच त्यादिवशी काय घडलं हा किस्सा सुद्धा लिहिलाय. राजीव लिहितो की, 'मी मुंबईच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो होतो. गुगल मॅप्सने 3 किलोमीटरसाठी एक तास लागणार असल्याचं दाखवलं. मला असं वाटलं रिक्षा सोडून पायी चालत जाणं बेस्ट राहील. पण माझ्या रिक्षा ड्रायव्हरने मला त्याच्या बोलण्यात अडकवलं. आणि मला पण ते बोलणं जाम आवडलं.राजीव पुढं लिहितो की, "त्यानंतर ड्रायव्हरने मला विचारलं की तुम्ही कोणत्या देशांना भेट दिल्या आहेत. यावर त्याची मजा घ्यावी म्हणून मी ही काही ठिकाणांची नावं सांगितली."पण त्यानंतर ड्रायव्हरने जे बोलायला सुरुवात केली त्याची साधी कल्पना सुद्धा राजीवने केली नसेल. नेमकं काय म्हणतोय ड्रायव्हर ते लिंक वर क्लिक करा आणि एकदा बघूनच घ्या.

या व्हायरल व्हिडिओमधला ड्रायव्हरला वेगवेगळ्या खंडातील देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची नावं सांगतोय. विशेष म्हणजे रिक्षाचालक महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहे. या एका तासाच्या काळात ड्रायव्हरने नोटाबंदी, 2जी घोटाळा आणि पनामा पेपर्स सारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.काही दिवसांपूर्वी शूट केलेला हा व्हिडिओ आता एकदम वेगात व्हायरल होतोय. आत्तापर्यंत या व्हिडिओला 38 हजार लाईक्स मिळालेत. लोक या व्हिडिओवर कमेंटही करतायत. पण या सगळ्या कमेन्टमध्ये एका इन्स्टाग्राम युजरने खूपच भारी कमेंट केली आहे. यात तो म्हणतो, 'हा रिक्षाचालक बहुतेक खान सरांचा विद्यार्थी असावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने