मालिकेत वातावरण बदलणार...असा असेल पुढील कथाभाग?

मुंबई :आई कुठे काय करते' या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नुसतीच भांडणं होताना दिसत आहेत. देशमुखांचे घर जे नेहमी 'आनंदाचं नंदनवन' म्हणून दाखवलं जायचं तिथे जणू कुस्तीचा आखाडा रंगलेला दिसत आहे. अभिषेकनं बायको गरोदर आहे याचा फायदा घेत जो काही बाहेरख्यालीपणा केला आहे तो आता सर्वांसमोर आल्यानं मालिकेत भांडणाला पूर आलेला दिसत आहे.अर्थात करून-सवरुन झाल्यानंतर अभिषेक जी काही मुक्ताफळं उधळताना दिसतोय आणि आपली चूक मान्य करत नाही त्यामुळे तर चाहते भलतेच भडकले होते. अर्थात याचा परिणाम टीआरपीवर झाला आहे. पण लागलीच लेखिकेनं मालिकेत एक नवा ट्रॅक आणला आहे ज्यानं मालिकेतलं वातावरण पुन्हा बदलेल असं दिसतय. हे आम्ही नाही सांगत आहोत तर मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळीच्या पोस्टमधनं समोर आलं आहे. अर्थात हे त्यानं स्वतः चाहत्यांना सांगितलं आहे. चला,जाणून घेऊया नेमकं काय म्हणाला आहे मिलिंद पोस्टमध्ये.लवकरच अभिषेक आणि अनघाला मूल होणार होतं,पण आता अभिषेकचं सत्य समोर आल्यावर अनघा आणि मुलाच्या जीवाला धोका आहे असा ट्रॅक सुरु आहे. पण तरीदेखील पुढे काय घडणार याचा मागमूस लागत नव्हता. अनघा आणि मुल सुखरूप असले तरी घरी परतणार का? आणि परतल्यावरही देशमुखांच्या घरात टेन्शनच पहायला मिळणार तर काय मज्जा. पण आता मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे मिलिंद गवळीनं एक पोस्ट करत आता वातावरण बदलणार असं सांगितलं आहे त्यानं सोबत एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.अनिरुद्धनं पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत तो एका गोंडस बाळाला कडेवर घेऊन दिसत आहे. आणि तो व्हिडीओ पोस्ट करत एकार्थानं मिलिंदने मालिकेतला पुढचा कथाभाग कसा असेल याचे संकेत दिले आहेत. त्यानं लिहिलं आहे की,गोड गोंडस परी राणी”त्विशा”

“आई कुठे काय करते “ या मालिकेमध्ये देशमुख कुटुंबात आता आली आहे एकनवीन मेंबरकसली गोंडस आहे “ त्विशा “ .सहसा लहान मुलं दुसऱ्या कोणाकडे अशी पटकन जात नाही,पण हे बाळ अगदी हसत खेळत माझ्याकडे आलं,असं वाटलं नाही की पहिल्यांदाच हिला आपण पाहिलंय,भेटलोय, अगदी आपल्या कुटुंबांमध्ये एक नवीन मेंबर आला आहे असंच वाटत होतं,तिने क्षणात सगळ्यांनाच आपलंसं करून घेतलं.लहान बाळ असेल तर आपोआपच भाभी चैतन्य पसरतं,जीवन किती सुंदर आहे असं वाटायला लागतं,चेहऱ्यावरील निरागस हास्य,आमच्या सेटवरचे वातावरणच बदलून गेलं आहे.प्रेक्षकांना सूद्धा खूप छान वाटणार आहे बाळाच्या आजूबाजूला घडणारे प्रसंग बघून .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने