'शाहरुखचं काही खरं नाही!' आता 'झुमे जो पठाण' मधून दीपिकानं....

मुंबई : किंग खान शाहरुखच्या पठाण चित्रपटातील दुसरे गाणे झुमे जो पठाण हे आज सोशळ मीडियावर व्हायरल झाले आहे. अवघ्या काही वेळातच या गाण्यानं दहा लाखांहून अधिक व्ह्युजचा टप्पा ओलांडला आहे. बेशरम रंग सारखेच हे गाणे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडणार नाही ना असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याला कारण गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली बिकीनी काँट्रोव्हर्सी आहे.चाहते आपल्या लाडक्या शाहरुखच्या पठाणमधील दुसऱ्या गाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. ते गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पठाणवर जोरदार वाद सुरु झाला आहे. काहीही झालं तरी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका काही हिंदूत्ववादी संघटनांनी घेतली आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर बॉयकॉट पठाण अशी भूमिका घेतली आहे. तर अयोध्येतील संत परमदास दास यांनी तर शाहरुखला जिवंत जाळण्याची धमकीच दिली आहे.
तब्बल चार वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर शाहरुखचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोनाचा मोठा फटका किंग खान आणि त्याच्या प्रॉडक्शन हाऊसला बसला होता. त्यावेळीच त्यानं कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर आपण पठाण प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले होते. पठाणचा टीझर. पहिले गाणे प्रदर्शित होताच प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद त्याला मिळतो आहे. पठाण प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकल्यानं शाहरुखचीही डोकेदुखी वाढली असून त्यानं त्याविषयी प्रतिक्रियाही दिली आहे.भगव्या रंगाची बिकीनी घालून दीपिकानं बेशरम रंगवर जो डान्स केला तो अनेकांना खुपला. म्हणून की काय त्या भगव्या रंगाच्या बिकीनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्नही झाला. आता प्रदर्शित झालेल्या झुमे जो पठाणमधून दीपिकाचा पुन्हा एकदा बोल्ड अंदाज व्हायरल झाला असून त्यावरुन देखील वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

झुमे जो पठाणला अवघ्या काही तासांत मिळालेला जबरदस्त प्रतिसाद पाहता चाहते पठाणला पसंत करत असल्याचे दिसून आले आहे. अरिजितच्या आवाजातील त्या गाण्याला विशाल शेखर यांच्या संगीताचा साज आहे. गाण्याचे बीट्स तर चाहत्यांना कमालीचे भावल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेमधून दिसून येत आहे.झुमे जो पठाणला अवघ्या काही तासांत मिळालेला जबरदस्त प्रतिसाद पाहता चाहते पठाणला पसंत करत असल्याचे दिसून आले आहे. अरिजितच्या आवाजातील त्या गाण्याला विशाल शेखर यांच्या संगीताचा साज आहे. गाण्याचे बीट्स तर चाहत्यांना कमालीचे भावल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेमधून दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने