औरंगाबाद हादरलं; वाळूजमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

औरंगाबाद: औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहराजवळ असलेल्या वाळूज परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.घडलेल्या या घडनेमुळे पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, मागील तीन दिवसांत बलात्काराच्या दोन घटना घडल्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेत एका दहावीत शिकणाऱ्या मुलीला ढाब्यावर नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला तर, दुसऱ्या मुलीवर तिच्या घराच्या मागच्या बाजूला नेऊन अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी वाळूज पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र, तीन दिवसात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने शहरात पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर येथील पिडीत 17 वर्षीय विद्यार्थीनी सोमवारी (ता.19) रोजी सकाळी 7.30 वाजता शाळेत जाणेसाठी घरातून निघाली. ती शाळेच्या गेटजवळ पोहचली. तेव्हा अंदाजे 8 वाजता तिच्या परिचयाचा मित्र शिव चौधरी, रा. बजाजनगर हा त्याचे शाईन मोटार सायकलवर उभा होता. त्याने पीडित मुलीला बोलावून सांगीतले की, चल आज आपण माझ्या मोटार सायकलवर दोघे फीरून येवू. तेव्हा तिने त्यास माझी शाळा आहे, मी येत नाही.तु मला फिरण्याचा बहाणा करून मागे सुध्दा माझ्यासोबत घाणेरडे प्रकार केले होते. मी येत नाही, असे म्हणाली. परंतु आरोपी शिव चौधरी याने तीला परत परत सांगून त्याचे शाईन मोटार सायकलवर बसविले. व खुलताबाद येथील एका धाब्यासारखे हॉटेलवर घेवून गेला. तेथे एका रूममधे तीला घेवून जावून त्याने तिच्यासोबत ईच्छेविरूध्द जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यास नको नको म्हणून विद्यार्थिनीने बराच विरोध केला.

परंतु त्याने तिचे काहीही ऐकले नाही. त्यानंतर आरोपीने मोटार सायकलवर बसवून परत बजाजनगर येथे शाळेच्या गेटजवळ दुपारी 1 वाजता सोडले. त्यानंतर पीडित विद्यार्थिनी घरी गेली, तेव्हा ती शाळेत गेली नसल्याचे घरच्यांना व नातेवाईकांना समजले होते. त्यामुळे त्यांनी तीला विश्वासात घेवून विचारपूस केली असता घडलेला प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी शिव चौधरी यांच्या विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही घडला होता प्रकार -

आरोपी शिव चौधरी याने यापुर्वीही पिढीत विद्यार्थिनीला दोन वर्षा पुर्वीपासून तीन ते चार वेळेस खुलताबाद येथील त्याच धाब्यावर घेवून जावून तिच्यासोबत असेच कृत्य केल्याचे तिने सांगीतले. त्याबाबत कोणास काही सांगीतले, तर तुला मारून टाकीन. अशी धमकी दिली. त्याच्या धाकामुळे तिने हा प्रकार कोणाला सांगीतले नव्हता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने