अखिलेश-मायावतींनी राहुल गांधींचं निमंत्रण नाकारलं; सपा-बसपाला कशाचं दिलं होतं निमंत्रण?

दिल्ली : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी  यांच्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव  आणि बसपा सुप्रीमो मायावती  सहभागी होणार नाहीयेत. या दोन्ही नेत्यांना राहुल गांधींनी यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं.काँग्रेसची भारत जोडो यात्रा 3 जानेवारीला यूपीमध्ये दाखल होणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते कृष्णकांत पांडे यांनी सांगितलं की, 'यूपीतील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना या यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून निमंत्रण दिलं जात आहे.'

कृष्णकांत पांडे पुढं म्हणाले, अखिलेश यादव आणि मायावती यांच्याशिवाय ज्या नेत्यांना यात्रेत सामील होण्याचं निमंत्रण देण्यात आलंय. त्यात माजी मंत्री शिवपाल यादव, आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी, ओमप्रकाश राजभर, सीपीआयचे राष्ट्रीय सचिव अतुल अंजन आणि बसपासह विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला  समाजवादी पक्षासोबतचे संबंध सुधारायचे आहेत. कारण, समाजवादी पक्षच यूपीमध्ये भाजपला टक्कर देत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश आणि राहुल एकत्र दिसले होते. मात्र, त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वत: अखिलेश यादव यांना पत्र लिहून आणि फोन करून 'भारत जोडो यात्रे'मध्ये सहभागी होण्यास सांगितलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने