अजय देवगणने शेअर केला सेटवरचा फोटो; चित्रपट ओळखा पाहू

मुंबई: आज बॉलिवूडचे चित्रपट आवडीने बघितले जाते. चित्रपट विनोदी असो किंवा गंभीर चित्रपटाच्या सेटवर अनेक गंमतीजमती घडताना दिसून येत असतात. आजकाल बिहाइंड द सीन्सचे व्हिडीओ शूट करून व्हायरल केले जातात. जेणेकरून लोकांना पडद्यामागची धमाल बघता येते. बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगणने त्याच्या एका चित्रपटाच्या सेटवरच जुना फोटो शेअर केला आहे ज्यात सैफ अली खान दिसत आहे.अजय सैफ हे अभिनेते शेवटचे ‘तान्हाजी’ चित्रपटात दिसले होते, मात्र त्याआधी दोघांनी एकत्र काम केले आहे. त्याआधी ते ‘ओंकारा’ आणि ‘कच्चे धा’गे चित्रपटात एकत्र दिसले होते. अजयने शेअर केलेला फोटो हा कच्चे धागे चित्रपटातला आहे. या चित्रपटात अजय देवगण स्मग्लरच्या भूमिकेत दिसला होता. या दोन अभिनेत्यांच्या बरोबरीने मनीषा कोईराला आणि नम्रता शिरोडकर चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद लुथरिया यांनी केले होते.अजय देवगण सोशल मीडियावर सक्रीय असतो. आपल्या कामाबाबत तो कायमच चाहत्यांना माहिती देत असतो. सध्या तो ‘भोला’ या चित्रपटावर काम करत आहे. महत्त्वाचे म्हणजे तो या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात तब्बूदेखील काम करत आहे.अजय देवगण सोशल मीडियावर सक्रीय असतो. आपल्या कामाबाबत तो कायमच चाहत्यांना माहिती देत असतो. सध्या तो ‘भोला’ या चित्रपटावर काम करत आहे. महत्त्वाचे म्हणजे तो या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात तब्बूदेखील काम करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने