जब तक चल रही है...; टी शर्टच्या चर्चेवरून राहुल गांधींनी अखेर सोडलं मौन

दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाला अभिवादन केलं. त्यावेळी सकाळच्या वेळी सुद्धा टी शर्टवर गेले होते. त्यामुळे त्यांच्या टीशर्टवरील लूकवरून चर्चांना उधाण आलं होतं. त्यांनी अखेर या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या निमित्त ते एका कार्यक्रमात आले होते.दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना थंडी वाजत नाही का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या तर एवढ्या थंडीतही ते फक्त टी शर्टवर का येतात असा प्रश्न एकाने विचारला असता त्यांनी पत्रकारांना उत्तर देत "हा प्रश्न देशातील गरीब शेतकऱ्यांना का विचारत नाही?" असा प्रतिप्रश्न केला होता. त्यानंतर आज त्यांना परत हा प्रश्न विचारण्यात आला.प्रश्नावर उत्तर देताना, टी शर्ट ही चल रहीं है और जब तर चल रही है चलाएंगे... असं राहुल गांधी म्हणाले आहेत. तर त्यांचा आजच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आजही ते टी शर्टवर कार्यक्रमासाठी हजर राहिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने