आरआरआर नंतर 'कांतारा'ही ऑस्करच्या लढाईत ....

मुंबई : यंदा मनोरंजन विश्वावर दाक्षिणात्य चित्रपटांचा डक्का होता. मग तो पुप्षा असो किंवा आरआरआर, केजीएफ याचित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असली तरी ऋषभ शेट्टीच्या 'कंतारा' या चित्रपटही मागे नाही. या चित्रपटानेही जगभरात खळबळ उडवून दिली आहे. अविश्वसनीय यश मिळल्यानंतर कांतारा जगभरात प्रदर्शित झाला आहे.जगभरात या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. आता 'कंतारा'ला ऑस्कर 2023 मध्ये पाठवण्याची तयारी सुरू आहे. चित्रपटाच्या ऑस्कर नामांकनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. होंबळे प्रॉडक्शनचे संस्थापक विजय किरगंदूर यांनी एका मीडिया हाऊसशी बोलताना याबाबत माहिती दिली.
एका मीडिया हाऊसशी संवाद साधताना विजय किरगंडूर म्हणाले, 'आम्ही कांतारा चित्रपट ऑस्करसाठी  पाठण्याचा अर्ज सादर केला आहे. अजून अंतिम नामांकन येणे बाकी असल्याने आम्ही उत्सुक आहोत. कांतारा ही कथा लोकांची आहे. ती जगभरात पोहोचेल अशी आशा आहे.''कंतारा' हा चित्रपट याआधी फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, परंतु चित्रपटाची लोकप्रियता पाहता, तो तेलगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम सारख्या भाषांमध्ये डब करून रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनला असून, या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. थिएटरनंतर OTT प्लॅटफॉर्म Netflix वरही 'कंतारा' हिंदीमध्ये स्ट्रीम करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने