बॉलिवूडने ओळख दिली पण ओटीटीमुळे गाजले हे कलाकार..

मुंबई: गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सनीही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने मनोरंजन व्यवसायाला एक नवी दिशा दिली आहे आणि जसजसा काळ पुढे सरकतो आहे तसतसे ओटीटी प्लॅटफॉर्म अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. एवढेच नाही तर बॉलीवुडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेल्या कलाकारांनाही OTT ने प्रसिद्धीच्या शिखरावर नेले आहे. तेव्हा जाणून घेऊया, कोणत्या कलाकारांनी यंदा OTT वर पदार्पण केले.

माधुरी दीक्षित -फेम गेम

धक-धक गर्ल या नावाने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या माधुरी दीक्षितनेही यंदा ओटीटीवर पाऊल ठेवले आहे. अभिनेत्रीने नेटफ्लिक्सवर 'फेम गेम' या वेब सीरिजद्वारे ओटीटीवर एंट्री केली आहे. या वेब सिरीजमधील माधुरीच्या कामाचे खूप कौतुक होत आहे.

अजय देवगण - रूद्र

आपल्या दमदार अभिनयासाठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेला अजय देवगण याने यावर्षी हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या 'रुद्र द एज ऑफ डार्कनेस' या वेब सीरिजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. अजय देवगणची ही वेब सिरीज खूप आवडली आहे.
जुही चावला - हुश हुश

बराच काळानंतर जुही चावलाने देखील अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'हुश हुश' स्ट्रीम करून ओटीटीवर पाऊल ठेवले आहे. या वेब सीरिजमध्ये जुही चावलाचे वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

आयेशा झुलका-हुश हुश

९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा झुलकाहिने बराच काळानंतर पुन्हा बॉलीवूडमध्ये कमबॅक केले आहे.अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'हुश हुश' स्ट्रीम करून ओटीटीवर पाऊल ठेवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने