जोरदार भांडण अन् नंतर पॅनिक अटॅक, निमृत कौरच्या आजाराची शालीन भानोतने उडवली खिल्ली, पुढे काय घडलं पाहा?

मुंबई: ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये काही दिवसांपूर्वीच सुबूंल तौकीर खानला पॅनिक अटॅक आला. टीना दत्ता व शालीना भानोतबरोबर झालेलं भांडण सुंबूलला सहन झालं नाही. दरम्यान काही वेळानंतर सुंबूल ठिक झाली. आता घराती आणखी एका सदस्याला पॅनिक अटॅक आला असल्याचं समोर आलं आहे. निमृत कौर अहलुवालियाला घरात पॅनिक अटॅक आला. पण दरम्यान घरातील काही सदस्यांनी तिची थट्टा केली.या टास्करदरम्यानेच निमृत व शालीनमध्ये जोरदार भांडण होतं. शिवाय कॅप्टन्सीसाठी निमृत सुंबूल तौकीर खानला पाठिंबा देते. ते पाहून शालीनला राग अनावर होतो. तो निमृतला उलट-सुलट बोलू लागतो. भांडणामध्येच शालीन निमृतच्या मानसिक आजाराची थट्टा करतो.दरम्यान शालीनच्या या बोलण्यामुळे निमृतला राग अनावर होतो व तिला पॅनिक अटॅक येतो. याआधीही निमृतने आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याबाबत ‘बिग बॉस’ला सांगितलं होतं. निमृतला नैराश्येचाही सामना करावा लागत आहे. अशामध्येच शालीन तिची थट्टा करत असल्याचं पाहून प्रेक्षकही त्याच्यावर संतापले आहेत. आता विकेण्डच्या वारमध्ये सलमान कोणतं पाऊल उचलणार हे पाहावं लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने