'पठाण' सोबत होतेय 'द काश्मिर फाईल्सची' तुलना..काय आहे नवं प्रकरण?

मुंबई:  फिल्ममेकर अशोक पंडित यांनी शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमावर होणाऱ्या ट्रोलिंगचे समर्थन केले आहे. अशोक पंडित यांनी आपल्या ट्वीट मध्ये लिहिलं आहे की,''जर विवेक अग्निहोत्रींना शीव्या देणं,ट्रोल करणं योग्य होतं,कारण तेव्हा संपूर्ण इंडस्ट्री शांत बसली होती,तर 'पठाण'साठी केल्या जाणाऱ्या स्टुपिड कमेंट्स आणि ट्रोलिंग योग्यच म्हणाव्या लागतील. पण सोबत अशोक पंडितनी याची दुसरी बाजू देखील दाखवली आहेअशोक पंडित यांनी लिहिले आहे की,''जर काश्मिर फाइल्सवर केले गेलेले शाब्दिक हल्ले चुकीचे होते तर 'पठाण' ला देखील हेच लागू होतं''. अशोक पंडित यांच्या या ट्वीटला रीट्वीट करत विवेक अग्निहोत्री यांनी यावर सहमती दर्शवली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले आहे-''हम्म्म...काश्मिर फाइल्सच्या रिलीजवेळी लोकांनी या सिनेमाला खूप विरोध दर्शवला होता. आता शाहरुख आणि दीपिकाच्या 'पठाण' सिनेमाला खूप विरोध केला जातोय''.
अशोक पंडित यांनी लिहिलं आहे की,''आपले विरोधक निवडून त्यांना टार्गेट करायची गरज नाही. काही वेळेला आपलं शांत राहणं आपल्या शत्रूंना अधिक फायद्याचं ठरू शकतं, आणि यामागे तुमचा अजेंडा काही विशिष्ट हेतूने ठरलाय म्हणून तुम्ही शांत आहात असं देखील म्हटलं जाऊ शकतं. मी 'उडता पंजाब' आणि 'पद्मावत' सारख्या सिनेमांना जेव्हा विरोध झाला तेव्हा देखील सिनेमांच्या बाजूनं आवाज उठवला होता.पण त्यावेळी त्यांनाही इंडस्ट्रीमधून पाठिंबा मिळाला नव्हता''.अशोक पंडित यांनी पुढे लिहिले आहे की- ''आपल्यातील फूटीचा वेगवेगळ्या स्तरावर लोकांनी फायदा घेतला आहे,घेत आहेत''. अशोक पंडित यांनी समस्त मूग गिळून बसलेल्या बॉलीवूडकरांसाठी ही पोस्ट लिहिल्याचं वाचताक्षणीच कळतंय.शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांच्या 'पठाण' सिनेमाला वेगवेगळ्या कारणांनी ट्रोल केलं जात आहे. एकीकडे जिथे शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांच्याशी जोडलेल्या जुन्या वादांना पुन्हा उकरून काढण्याचं काम केलं जात आहे तिथे दुसरीकडे 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यावरनं रोज नवीन वाद निर्माण केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने