डोक्यावर पगडी, हातात भाला, ढाल अन्…; गायिका आर्या आंबेकरच्या पोस्टने वेधलं लक्ष

मुंबई: मराठी कलविश्वातील लोकप्रिय गायक आर्या आंबेकर तिच्या सुमधून आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असते. आर्या सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या आर्याने शेअर केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.आर्या आंबेकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन किल्ल्यावरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने जीन्स टॉप असा पोशाख करत डोक्यावर पगडी आणि हातात ढाल-भाला घेतल्याचं दिसत आहे. आर्याच्या या नव्या लूकमधील फोटोंमुळे चाहतेही संभ्रमात पडले आहेत.“एका मॉर्डन स्त्रीच्या आयुष्यातील दिवस. कोकरूप्रमाणे(बकरीचे पिल्लू) सौम्य आणि वाघाप्रमाणे भयंकर ती परिस्थितीनुसार रुप धारण करते” असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. आर्या तिचा नवीन व्लॉग घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.आर्या आंबेकर एक लोकप्रिय गायिका आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून तिला प्रसिद्धी मिळाली. ‘आर्यासा ऑफिशिअल’ या नावाने तिचं युट्यूब चॅनेल आहे. तिचे युट्यूबवर दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असून अनेक व्हिडीओ ती तिच्या चॅनेलवरुन शेअर करत असते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने