कतरिनाचं नवऱ्यासोबत 'जंगल में मंगल'...फोटो व्हायरल

मुंबई: कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडपं आहे. त्यांची केमेंस्ट्री ही चाहत्यांना खूप आवडते. यंदाचं वर्ष हे या कपलसाठी खूप महत्वाचं होतं. ते दोघेही अनेक रोमाँटिक फोटो पोस्ट शेअर करत आपलं प्रेम व्यक्त करत असतात. चाहतेही नेहमीच त्यांच्या फोटोंची आतूरतेने वाट पाहत असतात.हे कपल आता नववर्ष साजरा करण्यासाठी बाहेर गेले आहे. दोघेहीसोबत निवांत वेळ घालवतांना दिसताय. ज्याची झलक कतरीनाने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करताना तिने कॅप्शन दिले आहे, 'सो मॅजिकल…. मला वाटतं की हे माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.कतरिना कैफच्या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हे सुंदर फोटो समोर येताच चाहतेही दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली- 'हॅप्पी हॉलिडे.' दुसर्‍याने म्हटले- 'जंगल में मंगल' अशा अनेक कमेंट्स त्याच्या पोस्टवर पाहायला मिळतील.कतरिना कैफ लवकरच तिच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन करत आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर चाहत्यांसह शेअर केले आहे. यानंतर पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या टायगर 3 मध्येही ही कतरीना सलमान खानसोबत दिसणार आहे.कतरिना कैफ लवकरच तिच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन करत आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर चाहत्यांसह शेअर केले आहे. यानंतर पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या टायगर 3 मध्येही ही कतरीना सलमान खानसोबत दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने