मोदींच्या मातोश्री अनंतात विलीन; जड अंत:करणाने मोदी कर्तव्यावर परतले!

गुजरात: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.या अंत्यसंस्कारांसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित होते. त्यांनी हिराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला, तसंच पार्थिवासोबत शववाहिनीतून स्मशानभूमीपर्यंत प्रवासही केला.गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील उपस्थित होते. देशभरातून विविध नेत्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत.आई हिराबेन यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवनात पोहोचले आहेत. या ठिकाणाहून ते पश्चिम बंगाल इथं होणाऱ्या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग द्वारे सहभागी होणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या 7 हजार 800 कोटीच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर हावडा ते न्यू जलपाईगुडी ला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने