अटकेतील शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ; पोलिसांनी...

 मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला सहकलाकार शिझान खान याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत होती. त्यामुळे आज पोलिसांनी त्याला कोर्टात हजर करून कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने शिझानची पोलीस कोठडी एक दिवसाने वाढवली. अधिक तपासासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे 2 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने एका दिवसाने पोलिस कोठडी वाढवली. 24 डिसेंबर रोजी टीव्ही सिरीयलच्या सेटवरील स्वच्छतागृहात तुनिषाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.४ जानेवारी २००२ रोजी चंदीगढमध्ये ट्युनिशाचा जन्म झाला होता. टीव्ही मालिकांबरोबरच तिनं सिनेमांमध्येही काम केलं. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषाने खूप नाव कमावलं. तुनिषा शर्माने 'भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'इश्क सुभान अल्ला', 'गब्बर पूँछवाला', 'शेर-ए-पंजाब: महाराजा रणजित सिंह' आणि 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या शोजमध्येही त्यांनी काम केले. तुनिषा "फितूर", "बार बार देखो", "कहानी 2: दुर्गा राणी सिंह" आणि "दबंग 3" सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने