महाराष्ट्राचे दोन मंत्री आज बेळगाव दौऱ्यावर? सीमावर्ती भागात कडक पोलिस बंदोबस्त

मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद गेली अनेक दशकं सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या जत, अक्कलकोट, सोलापूर अशा भागांवर दावा ठोकल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालं.या सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी नेमण्यात आलेले समितीचे नेते चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आज (6 डिसेंबर) बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा तूर्त रद्द करण्यात आला असून तो लांबवणीवर टाकण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
दोन्ही राज्यांमध्ये भाजपचंच सरकार असल्यानं महाराष्ट्रातील नेतृत्वाकडून टोकाची भूमिका घेतली जात नसल्याच्या चर्चा रंगल्यात. मात्र, दोन मंत्र्यांचा हा दौरा तूर्त रद्द करण्यात आला असून तो लांबवणीवर टाकण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटकातील सीमावर्ती भागात पोलिस छावणीचं रुप आलंय. कोगनोळी टोलनाका, संकेश्वर, आप्पाचीवाडी, गायकनवाडी, निपाणी या बोर्डवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने