जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाचं सत्य कळलं अन् वधूपक्षाचं धाबंच दणाणलं!

सोलापुर:  सोलापुरातल्या एका तरुणाच्या लग्नाची राज्यभरात चर्चा सुरू होती. मुंबईच्या जुळ्या बहिणींशी या तरुणाने लग्न केलं आणि अडचणीत सापडला. महिला आयोगाने चौकशीचे आदेशही दिले. मात्र आता या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे.पोलीस चौकशीत या तरुणाचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे मुलीकडच्यांचेही धाबे दणाणले असणार. दोन जुळ्या बहिणींसोबत संसार थाटण्याची स्वप्नं पाहणाऱ्या अतुल अवताडेचं आधीच एक लग्न झालेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक नवीन वळण लागणार आहे.अतुलच्या पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज्य महिला आयोगाकडे त्याच्या पत्नीने दाद मागितली आहे. त्यामुळे आता अतुल सोबतच त्या जुळ्या बहिणींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. आता पुन्हा नव्याने हे प्रकरण गाजणार आहे.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने