कॉंग्रेसने हिमाचल जिंकलं त्यामागे 'या' दिवंगत नेत्याची आहे पुण्याई

हिमाचल प्रदेश:  गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूकीची देशभर चर्चा सुरू आहे. गुजरातमध्ये भाजप तर हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसमध्ये आपली बाजी मारणार, असं स्पष्ट चिन्हे दिसत आहे. जेव्हा जेव्हा हिमाचल प्रदेशच्या निवडणूका येतात तेव्हा प्रत्येकवेळी एक नाव समोर येतं ते म्हणजे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवगंत नेते वीरभद्र सिंह.वीरभद्र सिंह हे हिमाचल प्रदेशचे सहा वेळा मुख्यमंत्री तर पाच वेळा संसदचे सदस्य राहीले. हिमाचल प्रदेश च्या लोकांच्या मनावर पाच दशक राज्य करणारे आणि सर्वात मोठी राजकीय कारकिर्द असणारे वीरभद्र सिंह यांच्या विषयी जितकं जाणून घ्यावं तितकं कमी आहे.कॉंग्रेसचा मोठा नेता आणि हिमाचल प्रदेश मध्ये कॉंग्रेसचं वर्चस्व स्थापण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. केवळ २७ वर्षाचे असताना त्यांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकत 1962 मध्ये लोकसभा निवडणूकीतून आपला राजकीय प्रवास सुरू केला. ते पाच वेळा संसदचे सदस्यही राहले.राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 1983 मध्ये मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतला. त्यानंतर 1990 पर्यंत ते सलग दोनदा मुख्यमंत्री राहले. वीरभद्र सिंह यांची लोकप्रियता एवढी मोठी होती की 1985, 1993, 2003 आणि 2012 मध्येही ते मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. 2009च्या लोकसभा निवडणूकीनंतर ते केंद्रीय मंत्री राहले.वीरभद्र यांच्या राजकीय जीवनात अनेक अडचणी आल्या पण ते कधीच डगमगले नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असो की पार्टीच्या आतंरीक वाद पण ते नेहमी तटस्थ राहले. त्यांची लोकप्रियता एवढी होती की कुणीही त्यांची आजवर बराबरी करू शकले नाही.

अतिशय प्रेमळ आणि स्नेहभाव जपणारे वीरभद्र सिंह नेहमी म्हणायचे की माझी जनताच माझी सर्वात मोठी ताकद आहे. त्यांची लोकप्रियता एवढी होती की मतदारसंघात नामंकन पत्र दाखल केल्यानंतर निवडणूकीचा प्रचार करायला ते जायचे नाही तरीसुद्धा ते निवडून यायचे.राजकीय जीवनासोबतच त्यांचे वैयक्तित आयुष्यही तितकेच चर्चेत होते. 1954 मध्ये त्यांमी रत्ना कुमारी यांच्यासोबत लग्न केल. त्यांना चार मुली होत्या. 1983 मध्ये रत्ना कुमारी यांच्या मृत्यूनंतर 1985 मध्ये त्यांनी प्रतिभा सिंह यांच्यासोबत लग्न केले त्यांच्या पत्नीने पुढे मंडी संसदीय क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले.मुलगी अपराजिताचं लग्न पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा नातू अंगद सिंह यांच्यासोबत करुन दिले तर मुलगा विक्रमादित्य सिंह सध्या निवडणूकीच्या रणांगणात उतरले आहे.येणाऱ्या काळात विक्रमादित्य सिंह सुद्धा मुख्यमंत्रीपदावर दिसू शकते.या विधानसभा निवडणूकीत वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह यांनी सीएम पदासाठी दावेदारी बोलून दाखवली आहे. त्या म्हणाल्या ती हिमाचल प्रदेशमधील विरभद्र सिंग यांची राजकीय कारकिर्द कोणीही विसरु शकत नाही त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या जनतेची इच्छा आहे की त्यांच्याच कुटूंबातील कोणाला तरी नेतृत्व करण्याची संधी द्यावी.सध्या जयराम ठाकूर याचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित असल्याचं बोललं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने