'सलमानाचा भाऊ असशील पण, माझ्याशी लग्न करायचं तर...' पुजाची होती एकच अट

मुंबई:  बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या हटकेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. सलमानच नव्हे तर त्याचे भाऊ देखील हे नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. आज त्याचा भाऊ सोहेल याचा वाढदिवस आहे. त्याच्याविषयीच्या अनेक गोष्टींना सोशल मीडियावर उधाण आले आहे.बॉलीवूडमधील कपल्सच्या गोष्टी चाहत्यांना काही नवीन नाही. त्यात ती गोष्ट जर सलमान खानच्या कुटूंबाविषयी असेल तर मग त्याला वेगळाच रंग चढतो. सलमान खान आणि प्रसिद्ध अभिनेत्री पुजा भट्ट यांच्यातील रिलेशनशिपविषयी नेहमीच बोलले जाते. सोहेल आणि पुजा यांच्यातील लवस्टोरी ही चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. पुजानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, मला सोहेल खूप आवडायचा. काही गोष्टी अशा होत्या की, त्यामुळे ते नातं संपलं. पुजानं त्याचे कारणही सांगितलं आहे.
पूजाच्या बोल्डनेसची होती चर्चा -

त्यावेळी पुजा ही बॉलीवूडमध्ये सर्वाधिक चर्चेतील अभिनेत्री होती. तिचा चाहतावर्गही मोठा होता. सोहेल आणि तिच्यातील नात्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली होती. अशावेळी चाहत्यांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना काय उत्तर दिले पाहिजे असा प्रश्नच पुजासमोर होता. पुजा आणि सोहेल यांच्यातील वाद वाढण्याचे कारण एक चित्रपट होता. त्याचे दिग्दर्शन करणार होता सोहेल खान. त्यात सलमान प्रमुख अभिनेता होता. मात्र सलमानचे वडील या स्टारकास्टच्या विरोधात होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुजाचा बोल्डनेस हा सलीम खान यांना आवडत नव्हता.

चित्रपटच बंद करावा लागला होता....

सलमाननं शेवटी काही करुन सलीम खान यांनी विनंती केली होती. त्यानंतर चित्रपटाचे शुटिंग सुरु झाले. आणि त्याचवेळी पुन्हा एकदा सोहेल आणि पुजा यांच्यातील प्रेम फुलून आले. चित्रपट तर पूर्ण झाला नाही याचे दुसरे कारण म्हणजे त्याचे वाढणारे बजेट होते. सलीम यांना सोहेल आणि पुजा यांच्यातील रिलेशनशिपविषयी कळले त्यानंतर त्यांच्या कुटूंबात मोठा वाद झाला होता. सलमाननं देखील मध्यस्थी केली होती मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.असं म्हणतात की, पुजानं सोहेलला सांगितलं होतं की, तू सलमानचा भाऊ असशील पण तुझ्या बाकीच्या कुटूंबियामध्ये माझ्याविषयी जे मत आहे ते बदलले पाहिजे. नाहीतर आपल्यातील नाते पुढे जाणार नाही. यानंतर पुढे कधीही पुजा भट्ट ही सलमान, सोहेल, अऱबाज सोबत दिसली नाही. एवढेच नाहीतर आलियानं देखील सलमानसोबत अद्याप काम केलेलं नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने