गर्लफ्रेंड सबाच्या जवळही गेला नव्हता चाहता, तरी हृतिकनं दिलं ढकलून...नेटकरी भडकले

मुंबई: बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या सिनेमांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत राहिलेला पहायला मिळतो. सध्या हृतिक सबा आझादला डेट करत आहे. दोघं अनेकदा सर्वांसमोर हातात हात घालून फिरताना दिसतात,एकार्थानं सर्वांसमोर प्रेमाची कबूलीच दिलीय त्यांनी. दोघांना काही दिवसांपूर्वीच एका हॉटेलच्या बाहेर स्पॉट केलं गेलं,जिथे हृतिकने आपल्या चाहत्यांना धक्काबुक्की केल्याचं दिसून आलं.हृतिकचं ते वागणं अनेकांना खटकलं आणि लोक त्याला सोशल मीडियावर सुनावू लागले. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'विसरू नकोस या लोकांमुळेच तुम्ही मोठे झाला आहात, आणि यांनीच तुम्हाला डोक्यावर बसवलं आहे...,'तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'साऊथ स्टार्स कडून शिका काहीतरी'.डिनर केल्यानंतर हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद रेस्टॉरंट मधून बाहेर निघाले. ते आपल्या गाडीच्या दिशेने चालू लागलेच होते तितक्यात काही चाहत्यांनी सेल्फी क्लिक करण्यासाठी त्यांना विनंती केली. या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की हृतिक आपल्या चाहत्यांना धक्काबुक्की करत आहे, कारण त्याला सबाला आरामात कुणाचा स्पर्श होऊ न देता गाडीपर्यंत न्यायचे होते जेणेकरुन तिला कोणतीही अडचण होणार नाही.आता हृतिक रोशनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांना अभिनेत्याचे हे वागणे बिलकूल आवडलेले नाही. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'हृतिक तुला लाज वाटली पाहिजे. तु प्रेमाने देखील नकार देऊ शकला असतास. अशा पद्धतीनं ढकलून द्यायची काय गरज होती. उगाच नाही साऊथ कलाकारांच्या मागे लोक इतके क्रेझी असतात,त्यांच्याकडून शिक काहीतरी'. आणखी एकानं कमेंट केली आहे की,'बॉलीवूडच्या या घमेंडी कलाकारांची वागणूक चाहत्यांसोबत नेहमीच चांगली नसते. नेपोटिझम प्रोडक्ट्स आहेत सगळे'.

हृतिकच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच 'फाइटर' या सिनेमात अनिल कपूर आणि दीपिका पदूकोण सोबत दिसणार आहे. दीपिका आणि हृतिक पहिल्यांदा या सिनेमाच्या माध्यमातून स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दोघेही बॉलीवूडच्या टॉपच्या स्टार्समध्ये गणले जातात. त्यामुळे दोघांना स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील भलतेच उत्सुक आहेत. पण आता या अशा निगेटिव्ह बातम्यांमुळे हृतिकच्या सिनेमांवर आणि त्याच्या बॉक्सऑफिस कलेक्शनवर परिणाम नाही झाला म्हणजे मिळवले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने