"अंघोळ घालते राखी सावंत..." राखीला प्रसाद म्हणाला...

मुंबई: बिग बॉस मराठी आता दिवसेंदिवस रंगात येत आहे. घरामध्ये टास्क बराच गोंधळ उडाला आहे. दरम्यान टास्कवरून होणारी भांडणं, मारामारी, शाब्दिक चकमक, आरोप - प्रत्यारोप हे होताना आपण बघत आलोच आहे. पण घरांमध्ये कधी कधी भांडण्याच्या पलिकडे विनोद मजाक , मस्तीपण तेवढीच होते. घरातील इतर सदस्य एकमेकांना घेऊन विनोद करत असतात. पण या वेळी चक्क प्रसादाने कॉमेडी केली आहे आणि घरातील इतर सदस्यांना हसवलं आहे.बिग बॉसच्या घरात आल्यावर फक्त पहिले काही दिवस प्रसाद जवादे चर्चेत होता मग ते भांडण असो किंवा कोणाबरोबर संभाषण असो. तो आपल्याच धुंदीत असायचा. प्रत्येक चावडी मध्ये महेश मांजरेकरदेखील प्रसादची विचारपूस करायचे. त्याचे हे वागणे घराच्या सदस्यांना समजत नव्हतं. पण जेव्हा पासून ड्रामा क्वीन राखी सावंत बिग बॉसच्या घरात आली आहे तेव्हापासून तिने प्रसादला नेहमी बोल बोल करत बोलतच केलं आहे .

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात ती प्रसाद जवादे बरोबर फ्लर्ट करताना दिसून आली होती. तर आता प्रसादने राखीसाठी रॅप बनवला आहे . हो व्हिडीओ समोर आला अन् जोरदार व्हायरलही झाला आहे. बिग बॉसच्या प्रमोमध्ये सगळे सदस्य एकत्र बसलेले दिसताय. तेव्हा प्रसाद राखीसाठी रॅप सुरु करतो, "अक्षय केळकर च्या राज्यात आली फाइव्ह स्टार कॅप्टनशीची टास्क....अंघोळ घालते राखी सावंत फाय स्टार्स" याशब्दानी तो रॅप सुरु करतो आणि घरातील इतर सदस्य या रॅपचा आनंद घेत आहे. कॅप्टन अक्षयला खुपचं हसु येत आहे. इतके दिवसांनंतर प्रसाद बॅक टु ट्रॅक आलेला पाहून सगळेच खुश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने