मुंबई: बिग बॉस मराठी ४ आता मोठ्या रंजक वळणावर आलं आहे. घरात आता चार वााइल्ड कार्ड एन्ट्री झाल्या आहेत. बिग बॉसच्या खेळाचा कडक अनुभव असलेले सगळे मातब्बर आहेत हे चौघे. त्यातील एक राखी सावंत जिला हिंदी बिग बॉसचा दोन वेळा अनुभव आहे, दुसरा विशाल निकम जो बिग बॉस ३ चा विजेता आहे तर आरोह आणि मीरा हे बिग बॉस ३ मधले चांगले तगडे स्पर्धक होते. त्यामुळे असे दमदार स्पर्धक आल्याने बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा हंगामा पाहायला मिळत आहे.जेव्हापासून या चार वाइल्ड कार्ड एंट्री झालेल्या आहेत तेव्हापासून त्यांनी घरातील इतर सदस्यांना सळो की पळो करून सोडले आहे. आता तर बिग बॉसने स्वतः सुट्टीवर जाऊन राखी, मीरा, आरोह आणि विशाल यांनी बिग बॉसच्या घराचे बॉस केले आहे. त्यातही राखी या सर्व घराची राणी झाली आहे. त्यामुळे घरात नुसता राडा सुरू आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात या चार बॉस चा नुसता जयजयकार सुरू आहे. विकास मीराचे कौतुक करत म्हणतो, “मीरा राणी तू खूप छान आहे. एवढी CUTE दिसते ना तू कि मी सगळ्यात जास्त कावरा बावरा होतो तुला बघून” त्यावर राखी म्हणाली, 'नुसते डायलॉग नको लोटांगण घाल.' तर दुसरीकडे अपूर्वा आरोहला मनवताना दिसणार आहे. तर प्रसादने देखील “मीरा माता कि जय, मी तुझ्या चरणाशी पडत आहे” असे म्हणत शिड्यांवरून लोटांगण घातले.तर स्नेहलताकडून चुकून गळ्यात माइक घालायचे राहून जाते. याची आठवण बिग बॉस तीला करून देतात. पण राखी मात्रा हा मुद्दा चांगलाच ताणते. जर चूक झालीय तर शिक्षा ही व्हायला हवी असं म्हणत राखी स्नेहलताला चार वेळा स्विमिंग पूल मध्ये उडी मारायला सांगते. स्नेहलता आणि राखी मध्ये त्यावर वाद ही होतो. पण शेवटी स्नेहलताला राखीचे ऐकावेच लागले. आल्यापासून राखीने नुसती एकेकाची वाट लावली आहे.