किरण माने इथं डोळा मारायला आलाय.. राखीनं घेतली फिरकी..

मुंबई: बिग बॉस मराठी ४ आता मोठ्या रंजक वळणावर आलं आहे. घरात आता चार वााइल्ड कार्ड एन्ट्री झाल्या आहेत. बिग बॉसच्या खेळाचा कडक अनुभव असलेले राखी सावंत, मीरा जगन्नाथ, विशाल निकम, आरोह वेलणकर हे चौघे घरात नुसता धुमाकूळ घालत आहे. त्यात राखीने तर नुसता कहर केला आहे. तिने एकेकाची बोलती बंद केलीच शिवाय तिच्या विचित्र शैलीने प्रेक्षकांना पार हसवून वेडं केलं आहे. नुकतीच तिने किरण मानेची खिल्ली उडवली. त्यावेळी तिने किरण मानेला अक्षरशः स्वतःच्या तालावर नाचवले.गेल्या काही दिवसात राखी आणि किरणची चांगलीच यारी जमली आहे. अगदी दोन दिवसात त्यांच्यात मैत्री झाली. राखी सतत किरणची चेष्टा करत असते. त्यांना टोमणे मारत असते. परवा कॅप्टनसी टास्क दरम्यान पण किरणने राखीचे कौतुक केले. आज किरण अक्षरशः राखीच्या मागे झाडू मारत फिरताना दिसला.बिग बॉसच्या घरातील राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने आरडाओरडा करुन घर डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तितक्यात गार्डन एरियामधून किरण माने “राखे काय झालं राखे?” म्हणत घरात येतात. तेवढ्यात अक्षय केळकर किरण मानेंना तुम्ही राखीच्या मागे झाडू मारुन दाखवा, असं म्हणतो. त्यावर राखी म्हणते “इथे हे झाडू मारायला नाही, डोळा मारायला आले आहेत”. यावर सर्वांना हसू आवरत नाही.त्यानंतर किरण माने राखी सावंतचा पदर पकडून संपूर्ण घरात तिच्या मागेमागे फिरताना व्हिडीओत दिसत आहेत. राखी झाडू घेऊन घरात फिरत आहे आणि किरण माने तिच्या मागे मागे. राखी सावंतचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने