"माननीय जनता.." राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले रविश, भावुक पोस्ट

दिल्ली: एनडीटीव्हीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तब्बत २६ वर्षाची NDTV ची साथ त्यांनी सोडली. दरम्यान, राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच ट्विट केले आहे. याट्विटमध्ये त्यांनी नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.'न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड' एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीचे संस्थापक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी 'आरआरपीआर होल्डिंग्ज' म्हणजेच आरआरपी आरएचच्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता एनडीटीव्हीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रवीश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.दरम्यान, आज सकाळी रवीश कुमार यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी, नागरिकांचे आभार मानले आहेत.काय म्हणाले आहेत ट्विटमध्ये?

प्रिय जनता,

तुम्ही माझ्या सोबत आहात. तुमचे प्रेम हीच माझी संपत्ती आहे. मी तुमच्याशी खुप काळ संवाद साधला आहे. यूट्यूब चॅनेल हा माझा नविन मार्ग आहे. तुमच्या यूट्यूब चॅनलवर. हा माझा नवीन पत्ता आहे. गोडी मीडियाच्या गुलामगिरीविरुद्ध सर्वांनाच लढायचे आहे.

तुमचा

रवीश कुमार

अशा आशयाचे ट्विट रवीश कुमार यांनी केले आहे.

जनसामान्यांचे प्रश्न सातत्याने एनडीटीव्हीच्या 'प्राइम टाइम' या कार्यक्रमाद्वारे रवीश कुमार यांनी मांडले आहे. त्यानिमित्त रवीश कुमार यांना सर्वोच्च रॅमन मॅगसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. रवीश कुमार यांनी अथक प्रयत्नानंतर हे यशाचे शिखर पटकावले होते.१९९६ पासून ते एनडीव्हीमध्ये होते. समाजाच्या समस्या, देशातील परिस्थिती, सामान्य माणसाशी थेट संवाद साधण्याची त्यांची कला. 'रवीश की रिपोर्ट,' 'प्राइम टाइम' या कार्यक्रमाद्वारे जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने