मनाविरुद्ध नाही तर अब्दु रोजिक स्वेच्छेने पडला ‘बिग बॉस’च्या बाहेर, अखेर एग्झिटमागचं खरं कारण आलं समोर

 मुंबई : ‘बिग बॉस १६’ शोचे स्पर्धक पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. आता हा शो खूप रंगतदार होत आहे. कधी या घरात राडे होताना दिसतात तर कधी प्रेमाचे वारे वाहू लागतात. शो मधील सगळे स्पर्धा त्यांच्या खेळामुळे आणि त्यांच्या वागणुकीमुळे आता प्रसिद्ध झाले आहेत. पण त्यातून सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळवलेला स्पर्धक म्हणजे अब्दु रोजिक. पण अब्दुने नुकतीच या घरातून एग्झिट घेतली आहे. सर्वांमध्ये लोकप्रिय असलेला, घरात कधीही वाद न घालणारा अब्दु ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण आता यामागील खरं कारण समोर आलं आहे.अब्दु रोजिकला ‘बिग बॉस’मधून बाहेर काढल्यामुळे घरातील सर्वच सदस्य हैराण झाले. घराबाहेर पडताना अब्दु सर्वांना मिठी मारून ढसाढसा रडला. अब्दु या शोच्या बाहेर जाण्यामुळे सर्व प्रेक्षकांनाही दुःख नाही. तो ‘बिग बॉस’बाहेर होताच सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. अब्दुला परत आणा अशी मागणी प्रेक्षक सोशल मीडिया वरून करू लागले. मात्र आता अब्दुल स्वतःच्या इच्छेने ‘बिग बॉस’च्या बाहेर पडल्याचं समोर आलं आहे.एका मीडिया रिपोर्टनुसार, अब्दुच्या मॅनेजमेंट टीमने त्याला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर येऊ देण्यासाठी निर्मात्यांकडे विनंती केली होती. त्यानंतरच अब्दुला ‘बिग बॉस’बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. अब्दु रोजिकचा एक नवीन व्हिडीओ गेम प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी त्याचा एक शूटिंग करायचा असल्याने त्याला घराबाहेर पडावं लागलं.

‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यावर अब्दुने सोशल मीडियावर एक लाईव्ह सेशन केलं होतं. या तो ‘बिग बॉस’मध्ये परत येण्याबद्दलही बोलला. तो म्हणाला, “‘बिग बॉस’ एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे. आय लव ‘बिग बॉस.’ तुम्ही सर्वांनी मला खूप प्रेम दिलंत त्याबद्दल धन्यवाद. मी नक्कीच या शोमध्ये परत येईन.” आता अब्दुलच्या या बोलण्याने चाहतेही खूप खुश झाले आहेत. त्यामुळे आता अब्दुल शूटिंग संपवून कधी ‘बिग बॉस’मध्ये परततो याची सर्वजण वाट पाहत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने