दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचे (MPC) निर्णय जाहीर केले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी समितीचे चलनविषयक धोरण जाहीर केले. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली. यानंतर रेपो दर 6.25 टक्के झाला आहे. शक्तिकांत दास यांनी सांगितले की MPCच्या 6 पैकी 5 सदस्यांनी रेपो दरात बहुमताने वाढ करण्यास समर्थन दिले आणि त्यानंतर RBI ने रेपो दर 0.35 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. RBI ने सलग पाचव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, "आम्ही आणखी एका आव्हानात्मक वर्षाच्या शेवटी आलो आहोत आणि केवळ देशातच नाही तर जगातील अनेक देशांनी महागाईचा दर वाढलेला पाहिला आहे. जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे देशातील पुरवठा साखळी परिस्थिती आव्हानांना तोंड देत आहे. चलनवाढीचा दर वरच्या स्तरावर असताना बँक पत वाढ सध्या दुहेरी अंकांच्या वर येत आहे."
RBI ने मागील तीन MPC बैठकांमध्ये 1.90 टक्क्यांनी दर वाढवले
रिझर्व्ह बँकेने गेल्या तीन पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपोमध्ये 1.90 टक्क्यांनी वाढ केली आहे. यापैकी मे महिन्यात 40 बेसिस पॉइंट्स आणि जून आणि ऑगस्टमध्ये 50-50 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. सध्या रेपो रेट 5.90 टक्के आहे आणि आज आरबीआय रेपो रेट 0.35 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. असे झाल्यास रेपो दरात 6.35 टक्क्यांची वाढ होऊ शकते.