बाद फेरीत पोहोचण्यासाठी ई गटात चारही संघांत चुरस; माजी विजेत्या जर्मनीचा कस लागणार

 कतार : फिफा विश्वकरंडकातील ई गटामध्ये बाद फेरीत पोहोचण्यासाठी चारही संघांमध्ये कमालीची चुरस लागली आहे. स्पेन व जर्मनी या माजी विजेत्यांसह जपान व कॉस्टा रिका या चारही देशांकडे बाद फेरीत पोहोचण्याची संधी असणार आहे. या गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीमध्ये बाद फेरीचा गुंता सुटणार आहे.

जर्मनी कॉस्टा रिका व जपान-स्पेन यांच्यामध्ये या लढती होणार आहेत. एकीकडे चार गुणांसह अव्वल स्थानावर असलेला स्पेनचा संघ अजूनही बाद फेरीत पोहोचलेला नाही; तर दुसरीकडे अवघ्या एका गुणासह तळाला असलेल्या जर्मनीचा कस लागणार आहे हे निश्चित. जर्मनीला कॉस्टा रिकाला हरवल्यानंतरही बाद फेरीत पोहोचण्यासाठी स्पेन-जपान या लढतीच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.
जर्मनीने २०१४ मध्ये विश्वकरंडक जिंकण्याची किमया करून दाखवली होती, पण त्यानंतर २०१८ मध्ये रशिया येथे झालेल्या विश्वकरंडकात त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.

'इ' गटातील आजच्या लढती

  • जपान - स्पेन, अल रयान - मध्यरात्री १२.३० वाजता

  • कॉस्टा रिका - जर्मनी, अलखोर - मध्यरात्री १२.३० वाजता

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने