बिग बॉसच्या घरात साजिदला आठवलं त्याचं जुनं प्रेम..

मुंबई : यंदाचा 'बिग बॉस 16' चा सिझन कोणत्या ना कोणत्या कारणाने चांगलाच गाजत आहेत. त्यातच घरामध्ये साजिद खानची एन्ट्री झाल्यापासून तर शोमध्येही आणि बाहेरही जास्तच चर्चा रंगली आह. साजिदवर अनेक आरोप करण्यात आले आणि शो बाहेर काढण्याची मागणीही करण्यात आली होती.सध्या शोमध्ये चांगलाच गोंधळ सुरु आहे. ज्या जोड्या काही दिवसात प्रेमी जोड्या होतील असं वाटतं होतं. त्याच्यांतच आता यूद्ध रंगलं आहे तर काही स्पर्धकांमध्ये जोरदार मारामारी होतेय. नुकतचं प्रियांका आणि अंकित यांच्यात जोरदार वाद झाला होता. अंकितनं सलमानला तिच्याबद्दल सांगितलं आणि इतकचं नाही तर सौंदर्यासोबतही तो प्रियांकाबद्दल बोलत असल्याचं कळल्यावर प्रियांकाला खूप राग येतो.अंकित सौंदर्याशी बोलतो की प्रियंका नेहमी फक्त गेमबद्दल बोलते. अंकित प्रियांकाला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही ऐकत नाही. यादरम्यान साजिद खान अंकितला सांगतो की त्याने प्रियांकाची समजूत काढत रहावी. त्याच बरोबर तो साजिदला त्याचं जुन प्रेम आठवलं जेव्हा अंकितने साजिदला सगळी गोष्ट सांगितली तेव्हा साजिद म्हणाला की एवढ्या छोट्या वक्तव्यावर इतकं पॅनिक का व्हायचं आहे. मीही या गोष्टींतून गेलोय. मी पण अशा काही नात्यामध्ये होतो जिथे लोक हायपर व्हायचे. यावर अंकित म्हणतो की, तो आणि प्रियांका रिलेशनशिपमध्ये नाही आह्त. ते फक्त मित्र आहेत. यानंतर साजिद म्हणतो की, रिलेशनशिपमध्ये तुम्ही ऐकवू शकत नाही, तुम्हाला ऐकावं लागतं.

साजिदच्या या वक्तव्यामूळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. साजिद खानचं नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साजिद खानची गौहर खानसोबत एंगेजमेंटही झाली होती, पण हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. याशिवाय साजिदचे नाव जॅकलिन फर्नांडिस, तमन्ना भाटिया, रक्षंदा खान आणि ईशा गुप्तासोबतही जोडले गेले होते. गौहर खानने तर साजिदवर गंभीर आरोपही केले होते. तिला साजिदचं शोमध्ये स्पर्धक म्हणून येणंही आवडलं नव्हतं. तिने बिग बॉसला वांरवार सांगितलं होतं की त्याला घराबाहेर काढा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने